अमळनेर येथील तालुका क्रीडा संकुलातील जुन्या व नव्या बहुउउद्देशीय सभागृहसह खेळाच्या मैदानांचे लोकार्पण पालकमंत्री तथा ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सविस्तर वृत्त की, माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने १० कोटी ६६ लाख ९८ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता क्रीडा संकुलसाठी घेण्यात आली होती. त्यापैकी प्राप्त झालेल्या तीन कोटी रुपयांच्या निधीतून जुना बॅडमिंटन हॉलची दुरुस्ती, ४०० मीटर धावन ट्रॅक दुरुस्ती, बास्केट बॉलचे काँक्रीट मैदान, स्केटिंगसाठी काँक्रीट मैदान, व्हॉलीबॉल मैदान, तसेच कुस्ती, ज्यूडो, कराटे व इनडोअर कबड्डीसाठी नवीन बहुउद्देशीय हॉल बांधण्यात आले आहेत. खेळाडूंसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. या सुविधांचे दि २९ रोजी लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी जिप सदस्या जयश्री पाटील, माजी जिप सदस्या तिलोत्तमा पाटील, रिटा बाविस्कर,जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, मुख्याधिकारी तुषार नेरकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, निलेश विसपुते, महेश माळी, कमलेश मोरे, रावसाहेब पैलवान, शब्बीर पैलवान, गणेश ठाकरे, पिंटू भामरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.
