अमळनेर अर्बन बँके सारख्या शतक पार करणाऱ्या संस्थामुळे राज्यात स्व.यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्नसाकार झाले – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

अमळनेर येथील शतक पार करणाऱ्या अर्बन बँकेच्या झालेल्या ग्राहक मेळाव्यात राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की,“स्व.यशवंतराव चव्हाण, पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले स्वप्न अमळनेर अर्बन बँकेसारख्या १०० वर्ष काम करणाऱ्या संस्थामुळे राज्यात साकार झाले आहे.

अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अमळनेर को.ऑप.अर्बन बँकेचा शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य सभासद ग्राहक मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते अर्बन बँकेच्या अद्ययावत सोयींनी युक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.

बाबासाहेब पाटील पुढे म्हणाले, “सहकारी चळवळीत राज्याने लक्षवेधी प्रगती केली. अमळनेर अर्बन बँकेसारखी पारदर्शक कर्ज व्यवस्था निर्माण केल्यास बँका दिर्घकाळ चांगल्या चालू शकतात, असे ही त्यांनी सांगितले. नागरी बँकांना अधिकची जोखिम असते म्हणून सरकारने अर्बन बँकांसाठी आधार होईल, असे विशेष धोरण राबवावे. अमळनेर सारख्या ग्रामीण भागात शंभर वर्ष आर्थिक कारभार करणाऱ्या अर्बन बँकेच्या संस्थापक संचालकांचे ऋण व्यक्त करीत आताच्या संचालक मंडळाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. आमदार अनिल पाटील यांनी आपल्या भाषणात अमळनेर सारख्या ग्रामीण भागात लोकांना आर्थिक पातळीवर अर्बन बँकेने केलेले कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची माहिती देत सभासदांचे ऋण चेअरमन पंकज मुंदडे यांनी व्यक्त केले. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते फलकाद्वारे सभासदांसाठी १०% लाभांश जाहीर करण्यात आला तर अमृत धनसंचय योजना आमदार अनिल पाटील यांचे हस्ते जाहीर करण्यात आली. याप्रसंगी व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त सर्वसामान्य सभासद व जेष्ठ नागरीक यांच्यासाठी अमृत धनसंचय १०० योजनेची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.सदर समारंभात बँकेचे जेष्ठ सभासद, ठेविदार, कर्जदार यांचा सत्कार सन्मानपत्र देऊन करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव जयदेव ठाकूर, महाराष्ट्र अर्बन को.ऑप.बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय जव्हेरीलाल ब्रम्हेचा, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे अध्यक्ष संजय पवार,जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप रामू पाटील, माजी जि प सदस्या सौ.जयश्री पाटील, विभागीय सहनिबंधक संभाजी निकम, सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला,जिल्हा निबंधक गौतम बलसाने, सहाय्यक निबंधक व्ही.एम.जगताप आदी ,धनवर्षा बँकेचे हेमंत चेअरमन चौधरी, चंद्रकांत वाणी आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉ. चेअरमन रणजित शिंदे यांचेसह संचालक प्रविण जैन, लक्ष्मण महाजन भरतकुमार ललवाणी, प्रदीप अग्रवाल, दिपक साळी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, पंडित चौधरी, मोहन सातपुते, वसुंधरा लांडगे, डॉ. मनीषा लाठी, अँड. व्ही. आर. पाटील, अँड. विजय बोरसे बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील व कर्मचारी, पिग्मी एजंट, माजी कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!