अमळनेरचे युवा उद्योजक कैलास खैरनार यांची थायलंड येथील आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड..

   अमळनेर शहर प्रतिनिधी, डांगर बु. अर्थात उदयनगर चे रहिवासी उद्योजक कैलास नामदेव खैरनार यांनी बॅटरी आणि पॉवर एनर्जी क्षेत्रात ठसा उठविल्याने यांची पॉवर हब या नामांकित कंपनी ने थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे.

     कैलास खैरनार यांनी धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत बॅटरी आणि पॉवर एनर्जी क्षेत्रात रिटेल व होलसेल व्यवसायात उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषतः ऑटोमॅटिक बॅटरी आणि इन्व्हर्टर बॅटरी क्षेत्रात त्यांनी सखोल तांत्रिक अभ्यास आणि पारदर्शक व्यवसायाच्या जोरावर आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या याच अनुभवाची आणि योगदानाची दखल घेऊन पॉवर हब’ कंपनीने त्यांची या अभ्यासात्मक दौऱ्यासाठी निवड केली आहे.

    अभ्यास दौरा १७ फेब्रुवारी २०२६ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत थायलंडमध्ये पार पडणार आहे. या दौऱ्यादरम्यान तेथील बॅटरी निर्मितीचे अद्ययावत तंत्रज्ञान, ऊर्जा संवर्धन आणि पॉवर बॅकअप क्षेत्रातील नवीन संशोधनाचा ते अभ्यास करणार आहेत. या दौऱ्यामुळे खानदेशातील बॅटरी व्यवसायाला नवीन दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यांच्या या यशाबद्दल अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!