अमळनेर येथील जय हिंद व्यायाम शाळा व राजे शिवाजी मित्र मंडळ आयोजित ठेक्याची कुस्ती १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते ९ वाजेदरम्यान होणार असून या कुस्ती स्पर्धेस मंगळग्रह सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे.संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने या कुस्ती स्पर्धेस संस्थेचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

जय हिंद व्यायाम शाळा, शिवाजी नगर, शिरुड नाका परिसरात होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेचे उद्धाटन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल पाटील असतील तर प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, मुक्तद्वार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद शिंदे हे असणार आहेत.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माजी नगरसेवक प्रताप शिंपी, अमोल चौधरी, जीवन पवार, गिरीश पाटील, भैय्या गरबड पाटील, सुनील जिजाबराव पाटील, दीपक अशोक चौधरी, पवन चौधरी, सुरेश शिंपी, पवन शिंपी, प्रमोद वाघ, अरुण पाटील, शरद पाटील, लक्ष्मीकांत अशोक शिंपी, किशोर श्रीकृष्ण पाटील, विजय कैलास बडगुजर, मधुकर चौधरी, गणेश सुदाम पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे.
