अमळनेर (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि अमळनेर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ मधील शालेय शासकीय अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना १७ सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. तालुक्यातील शालेय विद्यार्थी तसेच ज्युनिअर कॉलेजमधील खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

तालुकास्तरीय स्पर्धांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे—
बुद्धिबळ : १७ सप्टेंबर मुलांचे सर्व गट व १८ सप्टेंबर मुलींचे सर्व गट — नोबल पोतदार स्कूल
बॅडमिंटन : १८ सप्टेंबर मुले व १९ सप्टेंबर मुली — प्रताप कॉलेज हॉल
कुस्ती : २१ सप्टेंबर सर्व गट — तालुका क्रीडा संकुल
फुटबॉल : २३ सप्टेंबर मुले व २४ सप्टेंबर मुली — प्रताप कॉलेज
व्हॉलीबॉल : २६ सप्टेंबर मुले व २७ सप्टेंबर मुली — जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय
कॅरम : ३ ऑक्टोबर मुले व ५ ऑक्टोबर मुली — अॅड. ललिता पाटील इंग्लिश स्कूल
कबड्डी : ७ ऑक्टोबर मुले व ८ ऑक्टोबर मुली — सायर देवी स्कूल
खो-खो : १० ऑक्टोबर मुले व १२ ऑक्टोबर मुली — आ. मा. पाटील आश्रमशाळा, रणाईचे
क्रिकेट : १३ ऑक्टोबर मुले व १४ ऑक्टोबर मुली — प्रताप कॉलेज
मैदानी स्पर्धा : १६ ऑक्टोबर मुले व १७ ऑक्टोबर मुली — तालुका क्रीडा संकुल
