काँग्रेसची विचारसरणीच देशाला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकते : अविनाश उमरकर…..अमळनेर काँग्रेस सेवा दलाचे एकदिवसीय शिबिर उत्साहात; ५०हून अधिक कार्यकर्त्यांचा सहभाग

अमळनेर  : अमळनेर काँग्रेस सेवा दलाचे एकदिवसीय शिबिर १७ सप्टेंबर रोजी प्रा. अशोक पवार यांच्या स्टडी रूममध्ये सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उत्साहात पार पडले. शिबिराच्या प्रारंभी दिशा संधान शिव, बापूराव ठाकरे, डी. ए. पाटील व संजय पाटील यांनी महात्मा फुले यांच्या विचारांना साजेसे गीत सादर केले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राजीव गांधी पंचायत राज प्रदेश अध्यक्ष अविनाश उमरकर यांनी काँग्रेसच्या विचारसरणीवर भाष्य केले. देशासमोरील विविध सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक बँकेचे माजी अधिकारी तथा शेतकरी नेते प्रशांत गावंडे होते. प्रास्ताविक अमळनेर तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी केले. जिल्हा वक्ता सेलचे अध्यक्ष संदीप घोरपडे यांनी शिबिरार्थींना काँग्रेसची ध्येय-धोरणे व संघटनात्मक कार्याबाबत मार्गदर्शन केले. अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी काँग्रेस सेवा दलाच्या कार्याचा आढावा मांडला.

दुपारच्या सत्रात सर्व शिबिरार्थींनी घरून आणलेले डबे एकत्रितपणे घेऊन सहभोजन केले. अध्यक्षीय भाषणात प्रशांत गावंडे यांनी काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात केलेला संघर्ष आणि स्वातंत्र्यानंतरच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. तसेच सत्ताधाऱ्यांना सातत्याने प्रश्न विचारण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे आवाहन केले.

प्रा. अशोक पवार यांनी ‘संघटन’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अमळनेर तालुक्यातील १०० गावांमध्ये काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शिबिरास भिकाजी पाटील, मनोज पाटील, मनोहर सूर्यवंशी, कन्हैया कापडे, गजेंद्र साळुंखे, मोतीलाल जाधव, रोहिदास कापडे, पार्थराज पाटील, कल्पना महिरे, मगन पाटील, सुधाकर भैसे, प्रकाश सोनवणे, शालिग्राम पाटील, रामकृष्ण पाटील, विकास पाटील, महेश पाटील, पी. वाय. पाटील, दिनेश पवार, राकेश पवार, सदाशिव पवार, कौस्तुभ पाटील, भगवान संधान शिव, अमित पवार, खंडेराव न्हावी, बापूराव पाटील, गोविंदा पाटील यांच्यासह सुमारे ५० शिबिरार्थी सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!