अमळनेर | “आपल्याला पुढील सर्व निवडणुका सोप्या करायच्या असतील, तर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेवर (SIR) अत्यंत बारकाईने लक्ष द्या. या मोहिमेतून तयार होणाऱ्या मतदार याद्या म्हणजे पुढील २० ते २५ वर्षांची सोय असून, आपल्या राजकीय भवितव्याचा तो आत्मा आहे,” असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले.

