अमळनेर प्रतिनिधी, येथील माजी आमदार साहेबराव पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

अमळनेर विधानसभा निवडणुकी कडे अनेकांचे लक्ष लागून आहे.या निवडणुकीत मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात लढण्यास आघाडीतील जवळपास डझन भर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.यात काँग्रेस पक्षाचे डॉ अनिल शिंदे,के. डी.पाटील,प्रा सुभाष पाटील,संदीप घोरपडे,सलोचना वाघ तर राष्ट्रवादी शरद पवार गटा तर्फे माजी आमदार डॉ बी एस पाटील,माजी आमदार साहेबराव पाटील,नगरसेवक श्याम पाटील,उन्मेष पाटील,सौ तिलोत्तमा पाटील व उद्योजक प्रशांत निकम ,प्रा अशोक पवार आदी इच्छुक आहेत.यामुळे आघाडीत तिकीट मिळविण्यासाठी आपसात आरोप प्रत्यारोप सह कुरघोडी करत असल्याचे दिसते.मलाच तिकीट मिळावे म्हणून पक्षाच्या वरिष्ठांना साकडे घालण्यात आले आहे.

यातील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी ही कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उमेदवारी करण्यास तयार झाले आहे.मात्र काही दिवसापूर्वी साहेबराव पाटील यांनी श्याम पाटील यांना उमेदवारी साठी समर्थन पत्र जयंत पाटील यांना दिल्याची बातमी प्रसारित झाली होती.यामुळे साहेबराव पाटील यांच्या भुमिके बद्दल अनेक साशंक आहेत.तसेच आघाडीच्या माध्यमातून अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आले नसल्याने अमळनेर विधानसभा मतदार संघात चर्चेला उधाण आले आहे.माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या उमेदवारी बाबत वेग वेगळे वावटळ उठत आहे.
मतदारांचा कौल बघण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी संवाद व समर्थन बैठकीचे नियोजन कण्यात आले आहे.सदर बैठक ही
बुधवार दि. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.३० वा.शहरातील अंबिका मंगल कार्यालय,गलवाडे रोड, येथे आयोजित केली असल्याचे त्यांच्या कार्यालय कडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.त्या प्रसंगी कृषीभूषण साहेबराव पाटील आता नेमकी काय भूमिका घेणार,याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
