डंके की चोट पे अंहकारी वृत्तीला अमळनेरच्या भूमीत गाडणार – मा आमदार शिरीष चौधरी

अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभेचे इच्छुक अपक्ष उमेदवार माजी आमदार शिरीष चौधरी यांचा प्रचार प्रसार पराकोटीला पोहचला.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजताच अमळनेर विधानसभेच्या निवडणुकीत आमदार होण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली.आघाडी कडे उमेदवारी मिळावी म्हणून रांग लागली.सदरच्या जागा ही आमच्या पक्षाला मिळावी म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांना साकडे घातले आहे.मात्र निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करूनही आघाडीचा उमेदवार ठरला नसल्याने तालुक्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अश्यातच मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून अपयशाला सामोरे जावे लागल्याने शिरीष चौधरी यांचे हातपोळले गेल्याने त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करण्याचे ठरवले व चौधरी बंधूंनी प्रचाराला सुरुवात केली.अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याने त्यांनां अनेक समाज घटकामंधून उदंड प्रतिसाद मिळत आहे.माजी आमदार शिरीष चौधरी यांचे वडील बंधू तथा राजकीय मास्टर माईंड म्हणून ओळख असलेले प्रा डॉ रवींद्र चौधरी यांच्या सूनियोजना मुळे प्रचार प्रसार शिगेला पोहचल्याचे दिसून येत आहे.त्यांच्या कडे व्यक्तीला आपलेसे करण्याची हातोटी विलक्षण असल्याने तालुक्यात विविध जाती समूहाला भावनिक साद घालण्यात ते पुरते यशस्वी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.आता पर्यंत तब्बल नऊ मेळावे शहर व ग्रामीण भागात घेतल्याने त्यांची नाळ मतदारांशी जुळली असल्याचे बोलले जात आहे.

 

करडी नजर न्युज सोबत अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचे सोबत झालेली मुक्त चर्चा…..

    अपक्ष उमेदवारी करू इच्छी नाऱ्या माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याशी करडी नजर न्युज ने संवाद साधला असता त्यांनी या प्रसंगी सांगितले की,माझी उमेदवारी ही अहंकारी,घमेंडी व भुमिशी गद्दारी करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आहे.विकासाच्या नावा खाली टक्केवारी खाणाऱ्या विरोधात आहे. तालुक्यातील बळीराजाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या विरोधात आहे.शहरातील वाढती गुन्हेगारीला पायबंद नघालणाऱ्याच्या विरोधात आहे.माझी उमेदवारी येथील खऱ्या अर्थाने शेतकरी भूमिपुत्रांच्या विकासासाठी व तरुणांच्या हाताला काम देण्यासाठीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!