काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षेत होणाऱ्या बूथ प्रमुख बैठकीस उपस्थित रहावे – के. डी.पाटील

 

अमळनेर प्रतिनिधी, तालुक्यातील काँग्रेस बूथ प्रमुख यांची आज होणार बैठक.उपस्थित राहण्याचे केले आवाहन.

अमळनेर विधानसभे कडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहेत.युती पेक्षा आघाडी तर्फे उमेदवारी करणाऱ्यांची बाऊगर्दी उफाळून बाहेर येत आहे.रोज नवं नवीन ईच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून चर्चेला येत आहे.राष्ट्रवादी सह काँग्रेसने या मतदार संघावर आपला दावा ठोकायला सुरुवात केली आहे. दोघा पक्षातील इच्छुक उमेदवार ग्रामीण भागात पायपीट करतानाचे चित्र दिसत आहे.मलाच उमेदवारी मिळणार या आविर्भावात फिरत असताना दिसते.प्रत्येकाने नागरिकांच्या भेटी गाठी सह कार्यकर्त्यांच्या बैठकीवर जोर देत आहे.

अमळनेर मध्ये काँग्रेस विचारधारेचे प्राबल्य असल्याचा दावा करीत स्थानिक कार्यकर्ते निवडणूक जिंकण्यासाठी डावपेच आखत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आज काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांचा अध्यक्षते खाली शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज नाट्य गृह येथे दुपारी २.०० वाजता

तालुक्यातील बूथ प्रमुख सह कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे काँग्रेस नेते बापूसाहेब के डी पाटील यांनी सांगितले असून सदर बैठकीत सगळ्या बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!