अंमळनेर युवासेनेची निर्णायक बैठक उद्या; ग्रामीण व शहराची नवीन कार्यकारिणी होणार जाहीर

अंमळनेर:आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने युवासेना आता ‘नव्या जोमाने आणि नव्या दमाने’ सज्ज झाली आहे. युवासेनेच्या ग्रामीण व शहरी भागातील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यासंदर्भात उद्या, शनिवार दि. ११ एप्रिल २०२६ रोजी एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

​मा आमदार शिरीषदादा चौधरींच्या प्रमुख उपस्थितीत घोषणा

ही बैठक माजी आमदार शिरीषदादा चौधरी आणि शिवसेना तालुकाप्रमुख गुलाब काशिनाथ पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या बैठकीत प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर ग्रामीण आणि शहरी भागातील नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

​बैठकीचा तपशील:

दिनांक: ११ एप्रिल २०२६ (शनिवार)

​वेळ: सायंकाळी ५:०० वाजता

​स्थळ: मा. आमदार शिरीषदादा चौधरी यांचे जनसंपर्क कार्यालय, स्टेशन रोड, अंमळनेर.

इच्छुकांची लागणार वर्णी

संघटनेत काम करण्यास इच्छुक असलेल्या नवीन तरुणांना या कार्यकारिणीत संधी मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीला युवासेनेचे सर्व विद्यमान पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख राहुल भास्कर कंजर यांनी केले आहे.

युवासेनेच्या या नव्या विस्तारामुळे अंमळनेर तालुक्यात शिवसेनेची ताकद किती वाढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!