
सध्याच्या परिस्थितीमध्ये तालुक्या स्तरापासून, तर जिल्हा व, मेट्रोसिटी पर्यंत, मोठमोठ्या मॉलची फार मोठ्या प्रमाणात चढा ओढ सुरू आहे. ग्राहकांसाठी मोठमोठ्या स्कीमा ऑफर देऊन ग्राहकांना माल खरेदी करण्यासाठी आकर्षित केले जात आहे. प्रत्येक मॉलमध्ये प्रचंड गर्दी खरेदीसाठी दिसत आहे, कारण त्यांना माफक दरात वस्तू एकाच ठिकाणी मिळत असतात, म्हणून अनेक ग्राहकांची, ओढ ही मॉल मध्ये खरेदीसाठी असते .

मॉल वाल्यांसाठी प्रत्येक कंपन्या, विशेष सूट व अनेक स्कीमा त्यांना देतात, म्हणून मॉल वाले, बाजारभावापेक्षा रेट कमी करून विकतात. अशा परिस्थितीत छोट्या दुकानदाराचा, फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गावात, तालुक्यात,जिल्ह्यात,छोटे व्यापारी त्यांच्याकडे ग्राहकी फारच कमी असल्याने, त्यांना घर खर्च दुकान भाडे लाईट बिल निघणे सुद्धा अवघड झाले आहे. कारण की छोटे दुकानदार हे, मॉल वाल्यांच्या बरोबरीत मालाची विक्री करू शकत नाही. तसेच ऑनलाईन खरेदीमुळे, ग्रामीण ते शहरी भागापर्यंत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे सुद्धा छोटा दुकानदार हा, आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकांना व्यापार हा बंद करावा लागत आहे. काही व्यापारी तर आर्थिक संकटामुळे आत्महत्या करीत आहे. छोट्या व्यापाऱ्यांना संसाराचा गाडा कसा ओढायचा हे संकट डोळ्यासमोर आहे. अनेक व्यापारी हे कर्जबाजारी झाले आहेत, त्यांना कर्ज फेडण्याची सुद्धा परिस्थिती राहिलेली नाही.
ग्रामीण भागात व तालुका स्तरावर अनेक व्यापारी परिस्थिती अभावी शिक्षण अपूर्ण असल्यामुळे, त्यांना नोकरी सुद्धा मिळत नाही. त्यांच्यासमोर आता जीवन कसे जगायचे हा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. तरी या छोट्या व्यापाऱ्यांकडे शासनाने विशेष लक्ष देऊन, व त्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. व व्यापाराची पद्धत बदलणे गरजेचे आहे. तरी या गंभीर समस्या कडे शासनाने त्वरित लक्ष दिले पाहिजे, व ठोस निर्णय घेतले पाहिजे अशी मागणी, छोटे व्यापारी व अनेक व्यापारी संघटना करीत आहे.
लेखक – सुरेंद्र जैन मांडळ, तालुका अमळनेर,जिल्हा जळगाव.
