अमळनेर : चैत्रोत्सवाच्या निमित्ताने सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांची सेवा करण्यासाठी अमळनेर येथील ‘किंग ऑफ किंग’ ग्रुप सरसावला आहे. या ग्रुपच्या वतीने सलग १७ व्या वर्षी गडावर जाणाऱ्या जवळपास ३ हजार भाविकांना साबुदाणा खिचडी, जिलेबी आणि अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.

