अमळनेर: मूडी प्र. अमळनेर (मूडी-दरेगाव ग्रुप ग्रामपंचायत) येथे कानबाई उत्सवाच्या उत्साहात गावकऱ्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श घालून दिला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा साहित्य वाटप आणि गावात वृक्षारोपण असा दुहेरी उपक्रम उत्साहात पार पडला.

