अमळनेर: अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून येथील प्रसिद्ध व्यावसायिक वसंत राजधर पाटील यांची नात अमृता (दियाना) हिची दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या १५ वर्षांखालील (Under-15) इनडोअर क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या निवडीमुळे अमृता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

