अमळनेर : नोबल पोदार लर्न स्कूल, अमळनेर येथे शासकीय शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील १३ शाळांमधील सुमारे १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १४, १७ आणि १९ वर्षांखालील वयोगटांमध्ये विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आपले कौशल्य पणाला लावले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरसेविका स्वप्ना पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तिलोत्तमाताई पाटील तसेच तालुका क्रीडा अध्यक्ष एस. पी. वाघ यांच्या हस्ते माँ सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विद्यार्थ्यांनी मेहनत, परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात प्रगती साधावी, देशाचा मानसन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच खेळाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन केले.
या स्पर्धेत विजयी होणारे खेळाडू जिल्हास्तरीय स्पर्धेत अमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून अरुण प्रभाकर सपकाळे, शेख सर, कैलास बाविस्कर, जितेंद्र जेठवा, पोदार स्कूलचे क्रीडा शिक्षक अर्शद शेख, जयेश मासरे व प्रितेश तुरणकर यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमास श्री. वामन चव्हाण, श्री. भास्कर चौधरी, शाळेचे प्राचार्य रमण कुमार, प्रशासकीय अधिकारी योगेश पाटील यांच्यासह सहभागी शाळांचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या चेअरमन डॉ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी व प्रशांत भगवान सूर्यवंशी यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात विविध क्रीडा प्रकारांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कौशल्याला वाव द्यावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यात पावसाळी क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. विविध क्रीडा प्रकार घेतले जातात. तालुक्यातील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे ह्या शाळेने…