अमळनेर क्रांतीज्योती एक सुलक्षणी मुलगी, आदर्श गृहिणी ,उत्तम विद्यार्थिनी, आदर्श शिक्षिका ,आज्ञाधारक सून, कष्टाळू पत्नी , चौकस व्यवस्थापक, कवयित्री, धुरंदर सत्यशोधक ,ज्वलंत समाजसेविका अशा विविध गुणांनी संपन्न असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी *जीवनाविषयी चिंतन करायला शिकवले *.असे उदगार युवा कल्याण प्रतिष्ठान च्या वक्त्या श्रीमती आशा महाजन यांनी काढले त्या सार्वजनिक विद्यालय सारबेटे येथे सावित्रीबाई जयंती निमित्त बोलत होत्या.

युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचालित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवा निमित्त 101 ठिकाणी व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित केले होते ,भाविका वाल्हे या विद्यार्थिनीने अति उत्कृष्ट सादरीकरण केले . ज्ञानज्योती सावित्रीबाई उत्सवात सुमारे 95 विद्यार्थी वक्त्यांनी भाषणाच्या माध्यमातून सहभाग नोंदवला तर युवा कल्याण प्रतिष्ठानचे 101 वक्ते विविध शाळांमध्ये व्याख्यानासाठी गेले होते.युवा कल्याण प्रतिष्ठानच्या ‘महापुरुषांच्या विचारांचा प्रचार’ या अभियानात सहभागी होण्याचा निर्णय सुमारे 15 महिलानी केला आहे. वक्त्यांची कार्यशाळा व वाचन साहित्याचे वाटप ही या अभियानाची खास वैशिष्ट्ये आहेत .प्राथमिक शिक्षिका आशा महाजन यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाविषयी तयार केलेले वाचन साहित्य सर्व शाळांना देण्यात आले.
अभियानाच्या वक्त्यान मध्ये प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय शिक्षकांचा व सेवानिवृत्तांचाही वक्त्यांमध्ये समावेश होता.हे अभियान माध्यमिक शाळांचे सर्व मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने राबविले जात असल्याचे आयोजकांनी सांगितले .घर घर संविधान या विषयावर एकाच दिवशी 500 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प युवा कल्याण प्रतिष्ठानने जाहीर केला आहे.
