श्री मंगळ ग्रह मंदिरात आज महारुद्र व महाशिवाभिषेकाचे आयोजन

अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह देव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी अर्थात २६ फेब्रुवारी रोजी महारुद्र व महाशिवाभिषेक महापूजा होणार आहे. मंदिरातील श्री मंगळेश्वर महादेव यांच्यावर नऊ मान्यवरांचे उपस्थितीत दुपारी एक ते सहा या वेळात सदर महापूजा होईल. दुपारी तीन वाजता महाआरती व तीर्थ महाप्रसादाचे वाटप केले जाईल .या महापूजे निमित्त मंदिरातील सभा मंडपात कैलास पर्वताची आकर्षक आरास व सजावट करण्यात आली आहे. दरम्यान मंगळवारचा भोम प्रदोष व बुधवारची महाशिवरात्री या पार्श्वभूमीवर मंदिरातील श्री मंगळदेव ग्रहाच्या मूर्तीला श्री महादेवाचे रूपात सजविण्यात आले आहे. मंदिर परिसरही सजविण्यात आलेला आहे. भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!