जवखेडे येथिल श्री गुरुदेवदत्त सार्वजनिक वाचनालयात महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा….

अमळनेर येथील श्री गुरुदेवदत्त सार्वजनिक वाचनालय जवखेडे येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक अंमळनेर महिला मंचच्या डॉ. रमा मुठे होत्या. सोबत व्यसपीठावर सौ.निर्मलाबाई पाटील, सौ.संगीताताई पाटील व श्रीमती भिकूबाई पाटील उपस्थित होत्या.

महिलांसाठी आदर्श असलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. महिलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणुन भव्य असे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.मा. डॉ. मुठे मॅडम यांनी महिलांना समाजातील वास्तव व आपल्या मुलांना आई म्हणुन असलेल्या जबाबदारी या बाबत विशेष मार्गदर्शन केले. महिला म्हणुन आपली कर्तव्य जबाबदारी हक्क या बाबत ही मोलाचे मार्गदर्शन केले. वाचनालयाचा नियमीत लाभ घेणाऱ्या वाचक महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला.त्या नंतर हळदी कुंकू चा कार्यक्रम झाला उपस्थित सर्व महिलांना भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

सौ.सारिका पाटील यांनी आभार मानून महिलांनी ग्रंथालयातील दर्जेदार वाचन साहित्याचा नियमित लाभ घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!