अमळनेर शहर प्रतिनिधी, येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरातील शिवसेना कार्यालयात मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करत संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. त्यांनी समाजातील एकोपा, शिक्षण आणि संघटन या माध्यमातून समाजविकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पाटील, उपतालुका प्रमुख भूषण कोळी, तालुका संघटक व सरपंच रामेश्वर खुर्द, गजेंद्र जाधव, तसेच संत श्री सेवालाल महाराज जयंती समिती अध्यक्ष किरण जाधव उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनिल पवार, संजय राठोड, विजय राठोड, अर्जुन राठोड, किशोर पवार, रणजीत राठोड, पांडुरंग जाधव, दीपक सैंदाणे, संदीप पवार, रितेश बोरसे, उमाकांत चव्हाण, मल्हारी पाटील यांसह सर्व शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. अखेरीस आभार प्रदर्शन किरण जाधव यांनी मानले.
या जयंती उत्सवात समाजातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, कार्यक्रमामुळे बंजारा समाजात नवचैतन्य निर्माण झाले.
जळगाव येथील पत्रकार दिन निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना दर्पणकार पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे…
अमळनेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंती निमित्त मान वदंना देण्यासाठी उसळला महासागर. संविधान निर्माते, विश्वरत्न, करुनेचा सागर, महामानव डॉ…