अमळनेर येथील फाफोरे जि प शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती *बालिका दिन* म्हणून साजरी करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की,युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर,अंतर्गत राष्ट्रीय प्रबोधन विचार अभियानांतर्गत विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री चिंधू ओंकार वानखेडे हे उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते सावित्री माईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमात कु हर्षदा पाटील या इयत्ता चौथीतील विद्यार्थिनीने सावित्रीबाईंची भूमिका साकारून आपले मनोगत व्यक्त केले. तर श्री चिंधु वानखेडे यानी सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. तर सावित्रीबाईंच्या भूमिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वानखेडेनी शंभर रुपयाचे बक्षीस दिले तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण केले.सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ शिक्षक श्री ज्ञानेश्वर शिंपी होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विजय पाटील सरांनी केले.
उत्सव यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी श्रीमती दिपाली पवार मॅडम सौ पुनम पाटील मॅडम व मुख्याध्यापक श्री सुनील जाधव यांनी प्रयत्न केले.
