अमळनेर येथील दर वर्षी महिला मंडळ दिवाळी पहाट राममंदिरात मोठ्या प्रमाणात साजरी करतात. यावर्षी ही दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी असंख्य महिलांनी एकत्र येऊन दिवाळी पहाट साजरी केली.
पौराणिक काळा पासून दीपावली या सणाला सुंदर रांगोळ्या. हार तोरणे. व दिप पणत्या लावून स्वागत करने ही हिंदू धर्माची संस्कृती पुढील पिढीने कायम जपावी म्हणून पाहिला दिवा श्री रामाला . उ. मा. अध्यक्षा महासंघ सौ. शोभा ताई रघुनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आलेल्या या विचाराला महिलांनी स्वयंम स्पूर्ती ने सहभाग घेतला तसेच दर वर्षी दिवाळी पहाट राममंदिरात मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी जास्तीत जास्त महीला वर्ग उपस्थित असावा तसेच मंगळ ग्रह समिती, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू, समाज सेवक सेविका आदींनी सहकार्य करावे अशी इच्छा याप्रसंगी महिलांनी व्यक्त केली.
दिवाळी पहाट साठी रुपाली जोशी, प्रतिमा साळवी, वैशाली चौधरी, स्वाती पोळ, भारती कार्लेकर, सोनाली साळुंखे, दिव्या बडगुजर, नंदा गायकवाड, उज्वला शिरोडे आदी महीला उपस्थित होत्या.वृक्षवल्ली अध्यक्षा नीलिमा सोनकुसरे व अपेक्षा पवार यांचे विशेष सहकार्य लाभले
अमळनेर प्रतिनिधी, येथील बळीराजा लोकसत्व समितीच्या वतीने बलिप्रतिप्रदा निमित्त सालाबाद प्रमाणे महात्मा बळीराजाची व सजवलेल्या नांगराची बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक…