अमळनेर येथील प्रांतधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे बदली झाली आहे.एक चांगला ज्ञानी अधिकारी म्हणून त्यांना नागरिकं ओळखत होते.
सविस्तर वृत्त की,प्रांतधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची शासकीय नियमानुसार अप्पर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती करण्यात आली होती त्यांची पोस्टिंग होणे बाकी होते.मात्र महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी दि 20 रोजी आदेश काढून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना केली आहे.
नितीनकुमार मुंडावरे हे कायद्याने चालणारे ज्ञानी अधिकारी होते. त्यांचा स्वभाव हा नारळा प्रमाणे होता. वरतून दिसायला कडक मात्र आतून नरम, दयाळु होता.कर्तव्यात कामचुकार पणा त्यांना आवडत नसे म्हणूनचं कार्यतत्पर अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात कोणतेही दाखले प्रलंबित नव्हते. विविध प्रकरणाची सुनावणी देखील जलद गतीने करून योग्य न्याय दिलेला आहे. प्रशासकीय कामकाजात त्यांचा वचक होता.
त्यांच्या पदोन्नतीबद्दल सर्वत्र अभिनंदन सह काहीसा हिरमोड सुद्धा होत असल्याची भावना नागरिकां मध्ये आहे.
अमळनेर प्रतिनिधी, येथील मौजे मुड़ी प्र.डांगरी येथे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे तसेच तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अनधिकृत…