अमळनेर येथील मुडी गावातील एकाला वाळू माफियांनी वाळूचे ट्रॅक्टर पकडून देतो म्हणून बेदम मारहाण केल्याचा घटना घडली.

सविस्तर वृत्त की, मुडी प्र. डांगरी येथील रहिवासी कमलाकर माधवराव पाटील हे आपल्या मुडी गावी कामानिमित्त आले होते.ते दि १७ रोजी रात्री ११ वाजता मित्रासोबत मांडळ येथील दवाखान्यातून परत येत असताना मुडी मांडळ रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ एका इसमाने त्यांची गाडी अडवली व त्यांच्या मित्रासोबत वाद घालू लागल्याने कमलाकर हे मध्यस्थी करू लागले. त्यावेळी तू रेतीचे ट्रॅक्टर पकडून देतो, तुला जिवंत सोडणार नाही असे सांगत न्हानु पोपट कोळी, राहुल पोपट कोळी, संतोष रामदास कोळी यांनी कमलाकर याला शिवीगाळ करत मारहाण करीत त्याचे शर्ट फाडून मोबाईल फेकत काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या इसमांनी त्यांची सोडवणूक केली. कमलाकर याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत.

वाळू माफियांचे प्रशासनातील अधिकारी वर्गाशी आर्थिक देवाणघेवाण होत असल्यानेच त्यांची मुजोरी वाढल्याची सुज्ञ नागरीक चर्चा करीत आहे.थातुरमातुर कारवाई करण्यापेक्षा ठोस पावले उचलण्याची गरज आहे.यामुळे महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. देशातील खनिज संपत्ती ची चोरी करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,म्हणून ग्रामस्थ मागणी करीत आहे.
