प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य विकास’ विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे दि 22 मार्च रोजी आयोजन

अमळनेर येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित प्रताप तत्त्वज्ञान केंद्र, अमळनेर येथे शनिवार दि. २२ मार्च २०२५ रोजी विद्यार्थ्यांसाठी ‘कौशल्य विकास’ या विषयांवर परस्पर वैयक्तीक कौशल्य, समस्या सोडविण्याचे कौशल्य, नेतृत्व कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन कौशल्य, प्रभावी संवाद कौशल्य तसेच विश्लेषणात्मक कौशल्य आणि नितिमत्ता या विषयावर PMUSHA- Soft Component अंतर्गत Skill Development Programme for Students या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे असे केंद्राचे कार्याध्यक्ष प्रा. सुधीर दादा पाटील व मानद संचालक प्रा.एस.डी.ओस्तवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
आजच्या युवा पिढीतील विद्यार्थ्यांसाठी परस्पर वैयक्तीक कौशल्ये म्हणजे व्यक्ती आणि गटांशी संवाद साधण्यासाठी आणि काम करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये या कौशल्यांना आंतरवैयक्तीक कौशल्ये, लोक कौशल्य किंवा सामाजिक कौशल्य तसेच समस्या सोडविण्याचे कौशल्य मध्ये मानसिक प्रक्रिया आहे. ज्यामध्ये समावेश होतो. समस्या किंवा समस्यांचा समुह ओळखणे, उपलब्ध माहितीमध्ये प्रवेश करणे, पर्यायी उपाय शोधणे आणि शेवटी सर्वोत्तम संभाव्य परीणामांसह उपाय निवडणे तसेच प्रभावी संवाद कौशल्यामध्ये तुमचे विचार स्पष्टपणे व्यक्त होणे. इतरांकडून मिळालेल्या माहितीचा अचुक अर्थ लावणे, व्यावसायिक जीवनात यश मिळविणे तसेच विश्लेषणात्मक कौशल्यामध्ये निष्कर्ष काढण्यासाठी माहितीचे छोट्या श्रेणीमध्ये विघटन करण्याची क्षमता असणे त्याचप्रमाणे नेतृत्व कौशल्य आणि वेळेचे व्यवस्थापन कौशल्य यामध्ये नेतृत्व ही सामाजिक प्रभावांची एक प्रक्रिया आहे जी निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी संघाच्या प्रयत्नांना जास्तीत जास्त वाढविणे त्याप्रमाणे वेळेचे व्यवस्थापन म्हणजे एखाद्याला काम करावे लागेल त्यावेळेत कार्य प्रभावीपणे पुर्ण करणे या दृष्टीकोनातुन मुख्य उद्दीष्ट आहे. या दृष्टीने भारत सरकारच्या PMUSHA- Soft Component या योजनेअंतर्गत एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांमधील विविध विषयांवरील कौशल्य विकास विषयांवर तज्ज्ञ मागदर्शक मार्गदर्शन करणार आहेत. सदर कार्यशाळेत दिवसभरात ४ सत्र होणार असून प्रथम सत्रात प्रा.डॉ. भरत खंडागळे, परस्पर वैयक्ति कौशल्य अणि समस्या सोडविण्याचे कौशल्ये याविषयावर मार्गदर्शन करणार असून द्वितीय सत्रात प्रा. डॉ. निता जाधव- नेतृत्व कौशल्य आणि वेळेचे व्यवस्थापन कौशल्ये या विषयावर तर तृतीय सत्रात प्रा.डॉ. कविता पाटील-प्रभावी संवाद कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करतील. तर चतुर्थ सत्रात प्रा.डॉ.पी.बी.भराटे विश्लेषनात्मक कौशल्य आणि नितिमत्ता या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर कार्यशाळेसाठी अमळनेर शहर व ग्रामीण परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी यांत सहभागी होतील अशी माहिती केंद्रातर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!