नंदुरबार येथील बस आगाराची दुर्दशा झाल्याने प्रवाश्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.बस स्थानकात अतिक्रमण वाढल्याने प्रवाश्यांना अनेक अडचनीना सामोरे जावे लागत आहे.
नंदुरबार बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी माठ ठेवण्यात आले आहेत, पण त्यात पाणी नाही. महाराष्ट्र सरकारने महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा दिल्या आहेत, पण आजही प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक असूनही नंदुरबार बसस्थानकावर पिण्याचे पाणी, पंखे, वाहनांसाठी पार्किंग यांसारख्या आवश्यक सुविधांचा अभाव आहे. इतक्या उष्णतेतही बसस्थानकावर पंख्यांसाठी लागणारी वायर फिटिंग दिसत आहे पण पंखे नाहीत. प्रवाशांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत. अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही.
दुकानदारांनी प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावरच चहाचे स्टॉल, रसवंतीचे स्टॉल, नाष्टाचे स्टॉल, बसण्यासाठी टेबल खुर्ची, दुकानाचे स्टॉल व फलक असे अतिक्रमण केल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.या बस स्थानका मधील अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे ? यावर आगर प्रमुख व इतर अधिकारी गप्पी साधून का? असा प्रश्न उपस्थित होत आहे . नंदुरबार बसस्थानकावर सर्व व्यवहार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आणि अधिकारी झोपले असल्याचा आरोप प्रवाशी करीत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ याकडे काय कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
