आपले अमळनेर शहर शांत व सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी–संदिप घोरपडे

 

अमळनेरातील तरुण समजदार आहेत. मूर्ख, बेताल आणि बोलघेवड्या पोकळ नेतृत्वाच्या भडकाऊ भाषणाला अथवा सोशल मीडियावरील जाती-जातींत, धर्म-धर्मांत तेढ निर्माण करणाऱ्या भूतकाळातील जमिनीत गाडली गेलेल्या भुतावळीला ते आपल्या मनःपटलावर रेंगाळू देणार नाहीत.

याउलट, सध्या समाजातील वाढलेली हिंसकता कमी करण्यासाठी ते पुढाकार घेतील. *शेतकऱ्यांचे न थांबणारे आत्महत्यांचे सत्र अथवा शेतीमालास न मिळणारे रास्त भाव याविषयी ते चिंता व्यक्त करतील. तरुणाईला उपलब्ध नसलेल्या रोजगाराचा विचार करतील. सोबतच महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत करतील. गरिबांच्या हातून निसटू पाहणारे शिक्षण सर्वसामान्यांच्या आवाक्यात कसे येईल, याविषयी धोरण आखण्यात पुढाकार घेतील.

याबाबत मला पूर्ण खात्री आहे. फक्त आणि फक्त अंधभक्तांनी या सुशील, शांत आणि संयमी शहराचे वातावरण गढूळ करण्यासाठी अफवांचे पीक पेरू नये.

सोबतच, प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांकडून चोख सेवा बजावून घेतली, तर अमळनेरची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाही, याचा मला विश्वास आहे.

*”खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे!”*

आपल्यातला एक,
संदीप घोरपडे
📞 9422279710 | 8275054310

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!