जळगांव येथील जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांची नियुक्ती तर श्री. अंकीत यांची संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
श्रीमती मीनल करनवाल या (IAS) बॅच: 2019 च्या देशातील ३५ वा रँक मिळविणाऱ्या बौद्धिक सक्षम असलेल्या अधिकारी म्हणून ख्याती प्राप्त आहे.त्या मुळच्या जिल्हा -देहरादून, राज्य – उत्तराखंड च्या असून त्यांचे शिक्षण दिल्ली येथे झाल्याचे समजते.
महिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा ! म्हणून महिला जगताला आवाहन करणाऱ्या सीईओ मीनल करनवाल यांची जळगांव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरिकांना त्यांच्या समस्यांवर त्वरित निराकरण व उत्तर मिळावे म्हणून प्रशासन आणि जनतेमध्ये सुसंवाद निर्माण झाला पाहिजे,याकरिता प्रयत्नशील असणाऱ्या अधिकारी म्हणून त्या प्रचलित आहेत.
विद्यार्थ्यांना मेहनत, चिकाटी आणि सातत्याचे महत्त्व समजावून सांगत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरित करून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची त्यांची संभाषण शैली प्रख्यात आहे.
पूर्वाच्या नियुक्त्याः—–
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड,
२) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी,नंदुरबार
३) प्रशिक्षणकाल पूर्ण, भंडारा जिल्हा
