जीर्ण विजतारा मुळे शेतकऱ्यांचे पीकांचे होणारे नुकसान भरपाई द्या… क्रांतिकारी शेतकरी संघटनाने केली मागणी

अमळनेर,शेतक-यांच्या शेतात शार्टसक्रीट मुळे शेतातील मका, गह, हरबरा व इनर पिकांचे नुकसान होत आहे. झालेल्या नुकसानीला महावितरण कंपनी, महाराष्ट्र शासन उर्जा विभाग जबाबदार असुन शेतक-यांना भरपाई देण्यात यावी म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटनेने वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, जळगाव यांना दिले निवेदन.

सविस्तर वृत्त की महाराष्ट्र राज्यातील विज वितरण कंपनी ग्रामीण व शहरी भागात विदयुत वाहीनी (तारा) हया ब-याच वर्षा पासून असून त्या अजिर्ण झालेल्या अवस्थेत आहेत.

महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीचा भोंगळ, बेजबाबदार व आडमुठे धोरणामुळे शेतक-यांचा जळगाव जिह्यात खुप मोठे नुकसान झालेले आहे.या नुकसानीला महावितरण कंपनी जबाबदार असुन, महाराष्ट्र शासन देखील जबाबदार अहे. दर वर्षी अर्थ संकल्पात उर्जाविभाग नवनवीन विस्तार योजना सुरु करते तर जुन्या विदयुत वाहीनी तारा बदलविन्या साठी ऊर्जा विभाग काय करीत आहे? शेतक-यांच्या नावाने राजकीय नेते , पक्ष सत्तेचा उपभोग घेतात पण शेतक-यांच्या विषयी आस्था व दया शिल्लक राहीलेली नाही. महावितरण कंपनी ग्राहकांकडुन अव्वाच्या सव्वा बिलाच्या माध्यमातुन पैसे वसुल करीत आहेत. तरी होणा-या नुकसानीला महावितरन कंपनी व महाराष्ट्र शासनाने शेतक-यांना भरपाई देण्यासाठी कायदेशीर तरतुद करावी.

शेतकरी असंघटीत असल्याने, शोषीत झाल्या मुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला आहे.महाराष्ट्रात दरोज १० शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरी सत्ताधारी व विरोधी नेते मंडळीनीं शेतक-यांना वा-यावर सोडुन दिलेले आहे.

जळगाव जिल्यातील पालकमंत्री, कैंबिनेटमंत्री, खासदार, आमदार लोकप्रतिनिधी यानी केंद्र व राज्यर सरकार कडुन जळगाव जिल्यात महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीला शेतक-यांच्या प्रश्नावर जाब विचारावा अशी माफक अपेक्षा क्रांतीकारी शेतकरी संघटना करीत आहे, अश्या आशयचे निवेदन क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी जळगाव येथील वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना दिले आहे.या प्रसंगी योगेश ठाकूर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!