अमळनेर येथील नगर परिषद वर प्रशासक असूनही कुठलीही कर वाढ न करता ४५८.५८ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प केला सादर.

सविस्तर वृत्त असे की, नपा प्रशासक तुषार नेरकर यांनी अर्थ संकल्प मांडताना कुठलीही करवाढ न करता जनतेला दिलासा दिला आहे. आगामी वर्षात महाराष्ट्र राज्य नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेवर २०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. रस्ते तसेच स्वच्छता अभियान , नागरिकांचे आरोग्य तसेच सोयी सुविधा यांच्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना राबविण्यात येणार आहेत.
यांच्या उपस्थित अर्थ संकल्प सादर…
या वर्षांचा अर्थसंकल्प लेखापाल सुदर्शनराज शामनानी व अंतर्गत लेखा परीक्षक कुणाल कोष्टी यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत सादर केला.
या माध्यमातून मिळते नपाला उत्पन्न….
अमळनेर पालिकेला विविध कराच्या माध्यमातून १४ कोटी ८३लाख ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. महसूल अनुदान अंशदान अर्थसहाय यातून ५१ कोटी ६ लाख रुपये , न पा मालमत्ता भाडे उत्पन्न १ कोटी ११ लाख रुपये , विविध प्रकारची फी यातून २ कोटी ७९ लाख ८० हजार रुपये , निविदा फॉर्म विक्री यातून १ कोटी ८० हजार रुपये , बचत ठेवी व्याज उत्पन्न २० लाख , ना परतावा रक्कम १३ कोटी ५० लाख इतर उत्पन्न १ कोटी २० लाख असे एकूण उत्पन्न ८५ कोटी २९ लाख १० हजार रुपये आहे.
यावर होतो नपाचा खर्च….
त्याच प्रमाणे कर्मचारी पगार भत्ते पेन्शन यावर ५६ कोटी ४५ लाख रुपये , प्रशासकीय खर्च विमा ऑफिस , लाईट बिल ,दावे खटले ७ कोटी ७९ लाख ८७ हजार रुपये , व्यायामशाळा ,इमारत दुरुस्ती ,टी सी एल ,आग ,इलेक्टरीक साहित्य इतर खर्च १५ कोटी २५ लाख रुपये , इतर वाहन ,गटारी दुरुस्ती , औषधी आदी खर्च २ कोटी २४ लक्ष रुपये , ग्रंथालय ,वाचनालय ,न पा शिक्षण मंडळ निधी खर्च २ कोटी १० लक्ष ४३ हजार रुपये असा एकूण खर्च ८५ कोटी २६ लाख ४० हजार रुपये आहे.

असा आहे महसुली उत्पन्न व खर्च…
पालिकेचे महसुली उत्पन्न ८५ कोटी २९ लाख १० हजार तसेच भांडवली उत्पन्न ३७३ कोटी ४९ लाख ३३ हजार असे एकूण उत्पन्न ४५८ कोटी ७८ लाख ४३ हजार रुपये आहे तर महसुली खर्च ८५ कोटी २६ लाख ४० हजार ,भांडवली खर्च ३७३ कोटी ४९ लाख रुपये असा एकूण ४५८ कोटी ७५ लाख ४० हजार रुपये आहे. ३ लाख ३ हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आहे.
पालिकेने कोणतीही करवाढ न करता जनहिताचा अर्थसंकल्प सादर केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे.
