बापाने त्रासदायक मुलाला मारून स्वता:ला संपविले…

जळगाव येथील बापाने मुलाकडून होत असलेल्या छळाला कंटाळून मुलाचा दोरीने गळा आवळत खून करून स्वत देखील घेतला जगाचा निरोप घेतला.

सविस्तर वृत्त असे की,एरंडोल तालुक्यात दि. २७ रोजी मन सुन्न करणारी धक्कादायक घटना घडली. हितेश नामक मुलगा आपल्या माजी सैनिक असलेल्या वडिलांचा छळ करून मारहाण करीत होता. या प्रकाराला कंटाळून मंगळवार दि. २५ रोजी विठ्ठल पाटील यांनी त्यास कंटाळून त्याचा भोरखेडा गावाजवळील एका नाल्याजवळ खून करीत मृतदेह गाडून स्वतःगळफास घेत आत्महत्या केली. विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली असून त्यात मुलगा हितेश हा दारू पिवून सातत्याने मारहाण करीत असल्याचा उल्लेख होता.

बुधवारी विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला दिशा दिली व गुरुवारी मयत तरुणाचा मृत्देह आढळल्याने तो श्वविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

घटनास्थळी सुती दोरी आढळली असून त्याद्वारे तरुणाला फाशी दिली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालातून नैमकी बाब स्पष्ट होईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,
एरंडोल निरीक्षक निलेश गाकवाड, धरणगाव
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार
देसले व पथकाने धाव घेतली.

एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!