अमळनेर येथील दिनांक 28/04/2025 रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दोन व्यक्ती हे त्यांचे ताब्यातील काळया रंगाच्या मोटर सायकल क्रमांक MH- 19 DR -9791 हीचे ने बेकायदेशीर गांजा कब्जात बाळगून विक्री करण्यासाठी कामतवाडी ता. अमळनेर गावाकडून जळगाव शहराकडे घेऊन जाणार आहेत.

सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अमळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक श्री केदार बारबोले साहेब यांनी पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय निकम, पोलीस हवालदार सुनील जाधव, पोलीस नाईक संतोष नागरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील अशांना सदर छापा कारवाईसाठी दोन सरकारी पंच, छापा कारवाईसाठी लागणारे साहित्य असे सोबत घेऊन रवाना केले. सदर पथकाने कामतवाडी ता. अमळनेर गावाजवळ रोडलगत असलेले तोरणमाता मंदिराजवळ एका काळया रंगाची मोटर सायकल क्रमांक MH -19 DR 9791 हिचेवरील दोन इसमावर छापा टाकला असता, त्यांच्याकडे एका पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये गांजा मिळून आला. सदर व्यक्तींकडून मिळालेला मुद्देमाल 90,246/- रुपये किमतीचा 4.546/- ग्रॅम वजनाचा गांजा,45,000/- रुपये किमतीची काळया रंगाची मोटर सायकल क्रमांक MH -19 DR 9791 असे एकूण 1,35,246/- रुपये चा मुद्देमाल सह राकेश गुलाब पाटील व करण गजानन भिल या दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री राजू जाधव हे करीत आहेत.

परीक्षाधिन पोलीस उपअधीक्षक श्री केदार बारबोले :–
अमळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे सह गुन्हेगारी पूर्ती वाॅश आउट करून नागरिकांना भयं मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नसून त्याचे विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
