पोलिसांच्या सतर्कतेने महिलेला परत मिळाली दागिन्यांची पर्स

अमळनेर येथे मुंबई वरून आलेल्या महिलेची रिक्षातून प्रवास करताना सोन असलेली हरवलेली पर्स तात्काळ शोधून देण्यात पोलिसांना मिळाले यश.

सविस्तर वृत्त की,मीना सोनवणे नामक महिला या मुंबई मधील गोरेगाव येथिल रहिवाशी खान्देश एक्स्प्रेसने अमळनेर येथे आले असता आपल्या जवळ सामान जास्त असल्याने त्यांनी दोन रिक्षा केल्या पैकी एका रिक्षात सर्व सामान आणि दुसऱ्या रिक्षात स्वतः सह सोबत असलेले नातेवाईक बसून शहरातील डॉ अंजली चव्हाण यांच्या दवाखाण्याजवळ उतरले.त्या नंतर वावडे येथे जाण्यासाठी त्यांनी दुसरी रिक्षा केली व मार्गस्थ झाले असताना ढेकू गावाजवळ सदर महिलेला आपली सोने ठेवलेली पर्स हरवल्याचे समजले. महिलेने तात्काळ अमळनेर पोलीस स्टेशन गाठले. तेथे कर्तव्यावर असलेले परि. डीवायएसपी केदार बारबोले यांना पर्स चोरीला गेल्याची कल्पना दिली. श्री बारबोले यांनी महिलेला प्रवासची सविस्तर विचारपूस करीत असताना आपण नेमके कोणत्या रिक्षात बसून प्रवास केल्याचे सांगता येत नव्हते.श्री बारबोले यांनी तात्काळ आपले पोलीस डीबी पथकातील पोलीस अधिकारी उपनिरीक्षक नामदेव बोरकर व पोलीस कर्मचारी निलेश मोरे , विनोद संदानशीव याना सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यासाठी पाठवले.महिलेने ज्या ज्या ठिकाना वरून रिक्षा प्रवास केला त्या ठिकाचे कॅमेरे तपासले असता एम एच १९ बी झेड ५०९१ नंबर असलेल्या रिक्षा असल्याचे समजताच सदर रिक्षाचा तात्काळ शोध घेतला असता सदर ची रिक्षा मिलचाळ येथील प्रभाकर सुखदेव साळी यांची असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ रिक्षा शोधून प्रभाकर साळी यांना विचारपुस केली असता ती पर्स रिक्षाच्या मागील बाजूस असल्याचे संगितले. त्या पर्समधील गळ्यातील सोन्याची पोत , कानातील रिंग असे दोन तोळ्यांचे सोने जसंच्या तसं आढळून आल्याने सदर ची पर्स श्री बारबोले यांनी महिलेला परत केली व रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे पर्स शोधून परत केल्याने म्हणून डीवायएसपी केदार बारबोले यांनी रिक्षाचालक प्रभाकर साळी याचा श्रीफळ देऊन सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!