अमळनेर येथील सेवानिवृत्त कर्मचारी यांचे बँकेतून पैसे काढल्यानंतर पाठलाग करत दोन दुचाकीस्वारांनी ९ लाख रुपयांची पिशवी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडली.
सविस्तर वृत्त की,नगरपालिकेचे सेवानिवृत्त कमर्मचारी बापू शिंगाणे (रा.भोईवाडा) हे पत्नी सुरेखा यांच्यासोबत शहरातील IDBI बँंकेतून ९ लाख रुपये काढून घरी जात होते.मात्र, घराजवळ पोहोचताच काळ्या मोटरसायकलवर आलेल्या दोन इसमांनी वेगाने येऊन पैसे असलेली पिशवी हिसकावली आणि पसार झाले.नागरिकांनी चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ते पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,डीवायएसपी भाऊसाहेब घोलप, पोलीस निरीक्षकविकास देवरे आणि इतर अधिकाच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे दोघे आंध्र प्रदेशातील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ४ फैब्रुवारी रोजी खामगाव येथेही त्यांनी अशाच प्रकारे एका व्यक्तीला लुटल्याचे उघड झाले आहे.
बापू शिंगाणे यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस.ल ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास देवरे करत आहे.
