भुमी अभिलेख कार्यालयातील लॅपटॉप चोरणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

 

अमळनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील महत्वाच्या नोंदी असलेला लॅपटॉप चोरणाऱ्या चोरट्यास पकडण्यात पोलिसांना आले यश.

सविस्तर वृत की, दिनांक 03/04/2025 रोजी 17.30 ते दि. 04/04/2025 रोजीचे 11.30 वाजेचे दरम्यान भूमी अभिलेख कार्यालयातील महत्वाच्या नोंदी असलेला 30,000/- रुपये किमतीचा Lenovo Gaming 3 कंपनीचा लॅपटॉप कुलुप तोडुन अज्ञात आरोपीने चोरीस गेल्याबाबत तक्रार भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी सौ स्मिता पोरशा गावित यांनी पोलीस स्टेशन गु.र.नं. गुरनं. 134/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(3), 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . 

पोलीस अधिक्षक जळगावं श्री. डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कोते यांचे मार्गदर्शनाखाली, केदार बारबोले, परि. पोलीस उपअधिक्षक व दत्तात्रय निकम यांनी चोरीच्या गुन्हयांना आळा घालणेकामी तसेच दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेकामी सुचना दिल्या होत्या.

   सदर गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहेकॉ अशोक साळुंखे यांना तसेच गुन्हे पथकातील पोहेकॉ मिलींद सोनार, पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ निलेश मोरे, विनोद संदानशिव यांना तपासा दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार आरोपी प्रशांत जगन वाल्डे रा. मोठे गोरगावले बु। ता. चोपडा जि. जळगांव याने सदरचा गुन्हा केलेला असल्याचा संशय बळावल्याने त्यास अटक करुन त्याची पोलीस कस्टडी घेतली असता नमुद आरोपीने 30,000/- रुपये किमतीचा Lenovo Gaming 3 कंपनीचा लॅपटॉप पंच नामे भुषण सुकलाल पाटील, राकेश पुरुषोत्तम चौधरी यांच्या समक्ष काढुन दिल्याने, सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीताच्या पोलीस कस्टडी दरम्यान इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा कसोशिने प्रयत्न करीत आहोत.

परि. पोलीस उपअधिक्षक केदार बारबोले…

नागरीकांना अमळनेर पोलीस स्टेशन मार्फत आव्हान करण्यात येत आहे की, कोणी संशयीत इसम अमळनेर शहरात फिरत असल्यास, त्यांची माहीती तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणे करून चोरीच्या गुन्ह्यांना पायबंद घालणेकामी पोलीसांना मदत होईल आणि आपले अमळनेर शहर हे सुरक्षीत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!