तळवाडे येथील शेतकऱ्याच्या शेतातील मका महावितरण च्या बेजबाबदार कारभारा मुळे जळून खाक…..शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान      

 

अमळनेर,तळवाडे येथील शेतकरी महेंद्र शिवराम पाटील यांच्या दोन बिगे शेतातील 50 क्विंटल मका महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभारामुळे शार्ट सर्किट होऊन जळून खाक झाला . विद्युत तारा चीपकल्याने शेतकऱ्याच्या शेतातील ठिबक संच सहित हा मका व चारा जळून खाक झाला आहे. सदर शेतकऱ्याचे जवळजवळ एक लाख 70 हजारापर्यंत नुकसान झाले आहे. त्यानंतर सदर शेतकरी यांनी अग्निशामक दल यांना दूरध्वनी द्वारे फोन करून बोलवले परंतु तोपर्यंत संपूर्ण शेतातील मका ठिबक संच व चारा जळून आगीत भस्म झाला होता.या संपूर्ण मक्याच्या शेताला सदर शेतकरी यांनी टँकरद्वारे पाणी दिले होते .

दिवस रात्र मेहनत करून ऐन वेळेस शेतकऱ्याचा तोंडी आलेला घास हिराऊन महावितरण कंपनीच्या या आडमुठे व बेजबाबदार कारभारामुळे सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर शेतकरी यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबंधित शेतकरी व तालुक्यातील इतर शेतकरी यांच्याकडून करण्यात येत आहे. त्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!