अमळनेर येथील मौजे तांदळी येथे मा उपविभागीय अधिकारी श्री नितीन कुमार मुंडावरे व तहसीलदार श्री रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली व म. सहाय्यक पोलीस निरीक्षक मारवड यांच्या सहाय्याने एक अनधिकृत गौण खनिज रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहे. सदर चे टॅक्टर तहसील कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले.
पथकात श्री जितेंद्र जोगी ग्राम महसूल अधिकारी निंम , श्री विक्रम कदम ग्राम महसूल अधिकारी शहापुर , श्री प्रविणकुमार शिंगारे ग्राम महसूल अधिकारी सावखेडा श्री अभिमन जाधव ग्राम महसूल अधिकारी कन्हेरे, श्री जितेंद्र पाटील ग्राम महसूल अधिकारी शिरसाळे बु. श्री राजेंद्र केदार ग्राम महसूल अधिकारी पळासदळे, श्री आकाश गिरी ग्राम महसूल अधिकारी पातोंडा, श्री सचिन बामनाथ ग्राम महसूल अधिकारी करणखेडा, श्री वासुदेव तिरमले कोतवाल शहापूर आदींचा समावेश होता.
