अमळनेर मधिल सहा गावचे अतिक्रमित शिवरस्ते झाले मोकळे…

दिनांक 22 /3/ 2025 रोजी मा जिल्हाधिकारी साहेब जळगाव व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जळगाव यांच्या आदेशाने तालुक्यातील गाव पातळीवरील शेत पानंद रस्ते योजनेअंतर्गत गाव शिव वरील रस्ते मोकळे करण्यात आले.जवळपास पाच किलोमीटर असा रस्ता त्यावरील अतिक्रमण काढून चुना खुणा टाकून देण्यात आला.

सविस्तर वृत्त की, तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील साडे पाच किमी अंतराचे तीन शिवार रस्त्यावरील अतिक्रमण काढून मोकळे करण्यात आले.शिवार रस्ते मोकळे करण्याआधी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी सहमती दर्शविल्याने शांततेत व सामंजस्याने शिवार रस्ते मोकळे करण्यात आले.

यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,अव्वल कारकून (रोहयो) ए.डी.परदेशी, भूमी अभिलेख विभागाचे ए.के.गिरी व एस.एम थोरात, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (रोहयो) किशोर बी.ठाकरे, तांत्रिक सहाय्यक (रोहयो) सचिन पाटील, पिंपळे बु।। पिंपळे खुर्द व चिमनपुरी येथील सर्व ग्रामस्थ व सरपंच,उपसरपंच सदस्य,कार्यकर्ते युवराज पाटील,तंटामुक्त अध्यक्ष निंबा चौधरी, पोलीस पाटील सुदाम बळीराम पाटील,भैया बळीराम पाटील, नानाभाऊ हिलाल पाटील ,सुरेश नाना पाटील,आधार राजाराम पाटील,संदीप पाटील, रावसाहेब पाटील यांच्यासह सर्व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
————————————————
यागावातील अतिक्रमित शिव रस्ते केले मोकळे

सुंदरपट्टी – हेडावे सडावन ते खोपरपाट सुंदरपट्टी शिव रास्ता
म्हसले – म्हसले ते जुनोने भोणे शिव रास्ता
कळमसरे – गावठाण ते निंब, वासरे नाला शिव रस्ता,गार्ड रस्ता
सबगव्हाण – विलास पाटील ते विजय पाटील शेतापर्यंत लोनपंचम शिवरस्ता
पिंपळे खु.- गावठाण ते आटाळे शिव रस्ता
पिंपळे बु.- दक्षिण ते उत्तर गाड रस्ता
चिमनपुरी – चिमनपुरी ते पिंपळे बु.शिव रस्ता
————————————-
याकामी भूमी अभिलेखचे एस डी कुमावत,आर एन गायकवाड,एम डी चव्हाण,एस आर सोनार,एस एस अहिरे,धनराज वळवी,ए के गिरी,एस एम थोरात

महसूल विभागाचे मंडळ अधिकारी योगेश पाटील,गौरव शिरसाट,स्वाती गिरासे,पी पी शिंदे,पी एस पाटील व तलाठी रुचिका पाटील, महेंद्र पाटील,मधुकर पाटील, भूषण पाटील,जान्हवी जाधव आदींनी परिश्रम घेऊन सदर कामकाज सुरळीत पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!