पाचोरा येथील अवैध धंदा करणाऱ्या गुंडाने बातमी लावतो म्हणून शिवीगाळ करीत दिली जीवे मारण्याची धमकी.पत्रकार रस्त्यावर उतरून करणार आंदोलन.
सविस्तर वृत्त,पाचोरा शहरासह ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे गावठी दारू, ऑनलाईन चक्री, सट्टा पत्ता,मटका, राजरोसपणे सुरू आहेत.त्या अवैध धंद्यांना चपराक बसावा म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजात ओळख असणाऱ्या स्थानिक पत्रकारांनी या अवैध धंदे संबंधित बातम्या प्रसारित केल्या,त्यात वेध माझा न्युजचे संपादक राकेश सुतार यांनी देखील बातमी प्रसिद्ध केली होती. याचा राग मनात धरून अवैध धंदे चालवणारा तरुणाने दि 23 रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसरात पत्रकार राकेश सुतार इतर पत्रकार बांधवांसह उभे असतांना शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.या बाबत पत्रकार राकेश सुतार यांनी पाचोरा पोलीसात रितसर फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, मी राकेश सुभाष सुतार (वय २४) रा.नंदवन सिटी जुना अंतुर्ली रोड पाचोरा दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ०३:३० वाजेचा सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अवैध धंदे करणारा शेखर सुधाकर पाटील रा.कुष्णापुरी पाचोरा याने तु अवैध धंद्यांवर बोलतो तसेच बातमी व्हॉट्सॲप वर प्रसारीत करतो याबाबत मनात राग धरून तुला जिवंत ठेवणार नाही तसेच रात्री तुझा कार्यक्रम करेल अशी धमकी देत शिवीगाळ केली तसेच स्वतःच्या डोक्यात विट मारून पत्रकाराच्या विरोधात खोटी तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेला.
सदर घटनेची माहिती जिल्ह्यातील पत्रकारांना कळल्याने याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाचोरा येथे वारवार पत्रकारांवर खुलेआम मारझोड होत असल्याने राज्यातील पत्रकार संघटना एकत्रित येऊन राज्यभर निषेध करू लागला आहे.
न्याय मिळाल्यास पत्रकार झालेल्या अन्यायाच्या विरोधात एकत्र येऊन रस्त्यावरचे आंदोलन करनार असल्याने पोलिस प्रशासनाने सदर गुंड प्रवृत्तीच्या समाजविघातक व्यक्ती वर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी व पीडित पत्रकाराला योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्य किशोर रायसाकडा व नाशिक विभागीय उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे यांनी घेतली आहे.
