अमळनेर येथील गांधलीपुरा भागात असलेल्या वैश्या व्यवसाय बंद व्हावे म्हणून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश असतानाही सदर व्यवसाय बंद झालेला नाही म्हणून गांधलीपुरा परिसरातील नागरिकांनी दि ७ रोजी मूकमोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

उच्च न्यायालयाने सुरू असलेल्या देह व्यापाराबाबत स्थानिक पोलीस निरीक्षक, पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अहवाल मागविला होता व त्या अहवालाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती यांनी जिल्हा दंडाधिकारी, पोलिस अधीक्षक , पोलीस निरीक्षक अमळनेर तथा मुख्य अधिकारी नगरपालिका अमळनेर यांना आदेश केले होते की अशा प्रकारचा देह व्यापारला त्वरित आळा घालावा.पीटा कायदा अंतर्गत कलम १७ व १८ नुसार जिल्हा दंडाधिकारी ने त्वरीत आवश्यक ती कारवाई करावी. पोलीस अधीक्षक व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा पेट्रोलिंग करून अशा प्रकारचा देह व्यापार होणार नाही याची काळजी घ्यावी असे आदेश देऊन सुद्धा देहव्यापार सर्रासपणे सुरू आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने अमळनेर येथील शिष्टमंडळाने जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांच्या सह अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना उच्च न्यायालयाचा अवमान कशाप्रकारे होत आहे हे निदर्शनास आणून दिले व न्यायालयाच्या आदेशाची प्रशासनाने, जिल्हा पोलीस प्रमुखांनी व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदर करावे अन्यथा आम्हास उच्च न्यायालयात न्यायालयाची अवमान याचिका दाखल करावी लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.
देह व्यापार करणारे काही दलाल याचिकाकर्त्यांना त्रास देण्याच्या हेतूने त्यांच्यावर खोटे नाटे केसेस करीत आहे. तसेच काही समाजसेवक, नगरसेवक हे देह व्यापार करणाऱ्यांना मदत करीत आहे त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ७ मार्च शुक्रवार रोजी सर्व धर्मीय, सर्वपक्षीय मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे या मोर्चाचे समन्वय मौलाना रियाजोद्दीन,कुदरत अली यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
निवेदन देताना एकता संघटनेचे फारुक शेख व अनिस शहा, अमळनेर येथील रियाजुद्दीन शेख, कुदरत अली मोहम्मद अली, शेरखान मोहम्मद खान, कमर अली शहा, माझरोद्दीन अलाउद्दीन शेख, अब्दुल गफार खाटीक, हैदर मिस्तरी, शाहरुख शेख अनवर, सय्यद मोईन अली,आसिफ अली सय्यद, अदनांत शेख आदींची उपस्थिती होती.
