एसटी च्या धडकेत महिला जागीच ठार तर पती गंभीर जखमी

अमळनेर येथील मंगरूळ गावाजवळ एसटी चालकाने दुचाकीवरील जोडप्यानां धडक दिल्याने त्यात महिला मयत तर पती गंभीर जखमी.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील खडके गावातील रहिवासी असलेले समाधान राजपूत आपली पत्नी अरुणाबाई समाधान राजपूत दुचाकी वर खडके गावी जात असताना मंगरूळ गावा जवळील सेंट मेरी शाळेजवळ प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या कल्याण ते रावेर एस टी बसने त्यांना जोरदार धडक दिली.त्यात अपघातात दुचाकीवर मागे अरुणा राजपूत या जागीच ठार झाल्या तर समाधान राजपूत हे गंभीर जखमी झाले.जखमी समाधान राजपूत यांना शहरातील डॉ अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन एस टी चालक विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!