अमळनेर : वटसावित्री (वटपौर्णिमा) सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांची सुरक्षितता लक्षात घेता महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची सूचना आणि मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सणाच्या दिवशी पूजेसाठी जाताना महिलांनी सोन्याचे दागिने व मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत अत्यंत सावध राहावे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सणासुदीच्या काळात गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लांबवणाऱ्या लुटारू, चोर आणि चैन स्नॅचर्सपासून नागरिकांना सतर्क करण्यासाठी प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.

