अमळनेर पोलिसांची धडक कारवाई: बोरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर जप्त! ६ चालकांवर गुन्हे दाखल; अवैध गौणखनिज चोरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा पोलीस निरीक्षकांचा इशारा.
अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी अवैध गौणखनिज (वाळू) चोरी व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी धडक कारवाई केली आहे. बोरी नदीच्या पात्रातून बेकायदेशीरपणे वाळूची चोरटी वाहतूक करणारे तब्बल ६ ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले असून ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, चाळीसगाव परीमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांनी अवैध गौणखनिज चोरी रोखण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी कडक सूचना दिलेल्या होत्या. या सूचनांच्या अनुषंगाने अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले होते. या पथकात पोहेकॉ/२०२० सुनिल तेली, पोकॉ/२८२६ विनोद संदानशिव, पोकॉ/८४६ मयुर पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडील पोना/प्रमोद बागडे, पोकॉ/४४५ हितेश बेहरे आणि पोकॉ/गणेश पाटील यांचा समावेश होता. हे पथक दिनांक २८ जुलै २०२६ रोजी रात्री ०१.०० ते ०५.०० वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना, अमळनेर पो. स्टे. हद्दीतील हिंगोणे गावातील बोरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
पोललीस पथकाने धाड टाकून विना नंबर प्लेटचे ५ ट्रॅक्टर ट्रॉलीसह आणि एक MH-19CJ-0775 क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह अशा एकूण ६ ट्रॅक्टरवर कारवाई केली. हे सर्व ट्रॅक्टर कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे वाळू भरून चोरटी वाहतूक करत असल्याचे आढळले.
कारवाईत ताब्यात घेतलेले संशयित चालक:
१. योगेश नामदेव भोई (वय २५ वर्ष, रा. रुबाजीनगर, अमळनेर) २. प्रविण सुधाकर सोनवणे (वय ३६ वर्ष, रा. हिंगोणे खु., ता. अमळनेर) ३. राहुल छोटु ठाकरे (वय २० वर्ष, रा. रुबाजी नगर, अमळनेर) ४. अर्जुन अशोक मालचे (वय २५ वर्ष, रा. हिंगोणु खु., ता. अमळनेर) ५. सतीष मोहन बावीस्कर (वय ३२ वर्ष, रा. हिंगोणे खु., ता. अमळनेर) ६. सोमनाथ मधुकर मोरे (वय २० वर्ष, रा. रुबाजीनगर, अमळनेर)
पोलिसांनी सर्व ६ ट्रॅक्टर आणि चालकांना अमळनेर पोलीस ठाण्यात आणले असून ट्रॅक्टर चालकांवर व वाहनांवर रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या वाहनांचे मूळ मालक कोण आहेत, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.
”यापुढे अमळनेर तालुक्यात अवैध मार्गाने गौणखनिज (वाळू) चोरी व वाहतूक करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” — दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक, अमळनेर)
अमळनेर येथील परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले तालुक्यातील गुन्हेगारी च्या पार्श्वभूमीवर एक्शन मोड वर असल्याची चर्चा सुरू. सविस्तर वृत्त की, तालुक्यात…