जळगाव जिल्हा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम: पत्रकारांसाठी “विश्वासाची लेन्स” छायाचित्र स्पर्धेचे आयोजन!…..१९ ऑगस्ट ‘जागतिक फोटोग्राफी दिना’निमित्त विशेष पुढाकार; १५ ऑगस्टला पद्मालय हॉलमध्ये भरणार भव्य प्रदर्शन

जळगाव : नागरिक, पोलीस प्रशासन आणि समाज माध्यम यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उदात्त उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पत्रकारांसाठी “विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार-जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या ‘जागतिक फोटोग्राफी दिना’चे औचित्य साधून या विशेष उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.


​छायाचित्र हे केवळ एक चित्र नसून ते समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, कर्तव्य, निष्ठा आणि प्रेरणेचे प्रभावी दस्तऐवजीकरण असते. पत्रकार आणि छायाचित्रकार समाजातील अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असतात. आपल्या कॅमेऱ्याच्या एका क्लिकद्वारे ते इतिहासातील अनमोल क्षण जतन करत असतात. पत्रकारांच्या या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या छायाचित्रांना एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

​स्पर्धेचे स्वरूप आणि नियम:

पत्रकार बांधवांना खालील ७ प्रमुख श्रेणींमध्ये (Categories) आपले उत्कृष्ट फोटो पाठवता येतील:

​पोलीस इन पब्लिक सर्व्हिस (जनसेवेत पोलीस)
​क्राईम फोटो (गुन्हे व तपासविषयक)
​सोशल फोटो (सामाजिक वास्तव व उपक्रम)
​ट्रॅफिक फोटो (वाहतूक व्यवस्था व प्रबोधन)
​जळगाव हेरिटेज फोटो (जिल्ह्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा)
​स्पोर्ट्स फोटो (क्रीडा जगतातील क्षणचित्रे)
​वुमन एम्पॉवरमेंट फोटो (महिला सक्षमीकरण)

महत्त्वाच्या बाबी व वेळापत्रक:

फोटो पाठवण्याची अंतिम तारीख: १२ ऑगस्ट २०२६
​फोटो कुठे पाठवावेत: व्हॉट्सॲप क्रमांक ९७०२२००३१५
(टीप: प्राप्त छायाचित्रे पोलीस प्रशासनाकडून मोठी (Blow-up) करून प्रदर्शनात मांडली जातील.)
​प्रदर्शनाचे ठिकाण: पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय, जळगाव
​प्रदर्शन तारीख: १५ ऑगस्ट २०२६
​पुरस्कार: सर्व ७ श्रेणींमध्ये प्रत्येकी ३ विजेत्यांची निवड केली जाईल.
​पुरस्कार वितरण: जळगाव जिल्ह्याचे माननीय सर्व मंत्री महोदय यांच्या शुभहस्ते विजेत्यांना गौरवले जाईल.

​जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पत्रकारांना आवाहन


​”छायाचित्रांच्या माध्यमातून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग आणि सेवाभावाचे प्रभावी दर्शन घडवता येते. जळगाव जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडियाच्या छायाचित्रकार व बातमीदार बांधवांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे.”— जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!