महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विकास देवरे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले…. जनमांणसाच्या मनात घर करून 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवे नंतर झाले सेवानिवृत्त..

अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा सेवापुर्तीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

सविस्तर वृत्त की,कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याच्या आपल्या निस्वार्थ सेवेमुळे ओळख निर्माण करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी 39 वर्षांच्या प्रदीर्घ कार्यकाळानंतर सेवानिवृत्ती झाले. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेरच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

गेल्या काही दशकांत अमळनेर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देताना, त्यांनी अनेक संकटांचा सामना करत शांतता प्रस्थापित केली. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यात मोठे यश मिळाले. महिला आणि अबालवृद्धांच्या सुरक्षेसाठी त्यांनी प्रभावी उपाययोजना राबवल्या.

*संविधाननिष्ठ सेवेचे प्रतीक*

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची अडचण समजून घेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची पोचपावती म्हणूनच, आज संपूर्ण अमळनेर तालुका त्यांच्या कार्याचा गौरव करत आहे. विशेषतः लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शांतता आणि शिस्तीने निवडणुका पार पाडण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

*सन्मानपुढील वाटचालीस शुभेच्छा*

सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेरचे विभागीय उपाध्यक्ष प्रा डॉ विजय गाढे,तालुका अध्यक्ष समाधान मैराळे, नूरखान पठाण,हितेंद्र बडगुजर, प्रवीण बैसाणे, आत्माराम अहिरे,रिझवान शेख,योगेश पाने,गणेश चव्हाण, यदुविर पाटील आदी पदाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा देत, समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या त्यांच्या कार्याला सर्वांनी सलाम केला.

पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचे योगदान अमळनेरकरांच्या स्मरणात कायम राहील. त्यांच्या पुढील जीवनासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यासाठी खासदार स्मिता वाघ,आमदार अनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते,मुख्याधिकारी नेरकर,पारोळा पोलीस निरीक्षक पवार,मारवड ठाण्याचे एपीआय जिभाऊ पाटील यासह तालुक्यातील प्रतिष्टित मान्यवर, विविध क्षेत्रातील सामाजिक संघटना,पोलीस पाटील,पत्रकार बांधव ,सुज्ञ नागरिक,त्यांचे बालमित्र,ग्रामस्थ आदी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!