अमळनेर : येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक विजयकुमार भास्करराव वाघमारे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव तर्फे ‘समाजकार्य’ विषयात डॉक्टरेट (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे. विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या शुभहस्ते प्रा. वाघमारे यांना पीएचडी नोटिफिकेशन सोपवून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

