अमळनेर येथील बोहरा-मारवड रस्त्यावर पायी चालणाऱ्या इसमास भरधाव चारचाकीने पाठीमागून धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, दि २६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बोहरा – मारवड रस्त्यावर बोहरा गावातील रहिवासी संजय भील हा मजुरीसाठी पायी जात असताना मारवडच्या दिशेने जाणाऱ्या आर्टीका (क्र. एमएच ४७ एएन ५६७१) वाहनाचे चालक सुधीर पाटील (रा. बोहरा) याने बेशिस्त वाहन चालवत संजय भिल याला पाठीमागून जोरदार धडक दिली.चारचाकी भरदाव वेगात असल्याने सदरची गाफी नियंत्रणात नसल्याने गाडी निंबाच्या झाडाला ठोकली. या
अपघातात संजय भिल यांच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी धुळे नेल्याचा सल्ला दिल्याने त्यास धुळे येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमीचा भाऊ लक्ष्मण रमेश भील याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत सुधीर विश्वासराव पाटील याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ संजय पाटील हे करीत आहेत.
