अमळनेर येथील पोलीस स्टेशन परिसरात चोरी प्रकरणातील बेवारस स्थितीत १५ दुचाकी वाहने आहेत.पोलिसांनी आजपावेतो सर्वतोपरी प्रयत्न करुन बेवारस वाहनाच्या मालकांचा शोध घेतला परंतु संबंधीत वाहन मालक मिळुन आलेले नाहीत अथवा मालकी हक्काबाबत कोणीही पोलीस ठाण्याशी संपर्क वा मालकी हक्काचा दावा दाखल केलेला नाही. सदरची वाहने पोलीस ठाणे आवारात अनेक वर्षापासुन बेवारस स्थितीत पड़ून असल्याने ती गंजून खराब होत आहेत. तरी सदर वाहनांचा जाहीर लिलाव करुन निरगती करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ८५ प्रमाणे पोलिस सदरची बेवारस वाहनांचा जाहीरनामा दि.०७.०३.२०२५ रोजी प्रसिद्ध केलेली आहे. बेवारस वाहनांची सविस्तर यादी यासोबत जोडली आहे.

परिक्षाविधीन डीवायएसपी श्री केदार बारबोले
जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेल्या बेवारस वाहनाबाबत आपले मालकी हक्कांचे, हितसंबंध,
वारसा हक्क, तारण हक्क (Hypothecation), विमा हक्क (Insurance Caim) इत्यादी हक्काबबत मुळ दस्तऐवजासह पोलीस ठाण्यास जाहीरनामा प्रसिद्दध झाल्याचे दिनांकापासुन ६० दिवसांच्या आत (२ महिने) संपर्क करुन आपल्या मालकी हक्कांचे कायदेशिर खात्री देवुन आपले वाहन घेऊन जावे. तद्नंतर संबंधीत वाहनांवर आपला हक्क सांगता येणार नाही.तदनंतर महाराष्ट्र पोलीस अधिनिमयम सन १९५१ चे कलम ८७ नुसार जाहीर लिलाव करण्याची प्रक्रीया पार पाडण्यात येईल याची नोंद घ्यावी,अश्या आशयाचे पत्र अमळनेर परिक्षाविधीन डीवायएसपी श्री केदार बारबोले यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
बेवारस वाहनांची सविस्तर यादी :-

