अमळनेर येथील ॲड. सागर ढिवरे यांच्या प्रभावी युक्तिवादाने विशेष पोक्सो व एट्रोसिटी ऐक्ट व बलात्कार प्रकरणात आरोपीस जामीन….

   अमळनेर कोर्टतील विशेष केस क्र. 100/2025 (राज्य विरुद्ध वैभव दिनेश गलांडे उर्फ बोंबाड्या) या गंभीर स्वरूपाच्या पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात आरोपीस नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.

      सदर गुन्हा अमळनेर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. 137(2), 64, 249, 352 तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(r) (s),(3) (1)(w) (i) (ii) and 3(2)(v-a)(v) व पोक्सो कायद्यातील कलम 3,4,12 नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीकडून सविस्तर बाजू मांडण्यात आली.

    आरोपीतर्फे ॲड. सागर विजय ढिवरे (अमळनेर) यांनी प्रभावी व कायदेशीर मुद्द्यांवर आधारित युक्तिवाद सादर केला. पीडितेचे वय, तक्रारीतील विसंगती, तपासातील बाबी तसेच न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत आरोपीस जामीन मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती.

     सदर सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला आहे. या आदेशामुळे आरोपीस दिलासा मिळाला असून, बचाव पक्षाकडून न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!