केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडखानी करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा–सामाजिक कार्यकर्ते आणि पाडळसरे धरण जन आंदोलन समितीने केली मागणी

अमळनेर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडखानी करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक होत नसल्याने सर्वसामान्य हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलींच्या सुरक्षेची हमी काय? आरोपींना तातडीने अटक करून कठोर शासन व्हावे अशा मागणीचे निवेदन येथील सर्व राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


अमळनेर तहसील कार्यालय येथे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देताना झालेल्या चर्चेप्रसंगी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडखानी करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक होत नसल्याने सर्वसामान्य हजारो कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलींच्या सुरक्षेची हमी काय? अमळनेर सारख्या शहरात ग्रामीण भागातून शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हजारो मुली शिक्षणासाठी रोज येतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेच्या बाबत काळजी घेतली जाईल का? त्यांना न्याय मिळेल का? असे प्रश्न उपस्थित करून संबंधित प्रमुख आरोपींना राजकीय पाठबळामुळे पळून जाण्यास वाव दिला गेल्याने यामध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांचे सहकार्य झाले असे लक्षात येत असून संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी व कठोरात कठोर शासन होईल याबाबत गांभीर्याने कार्यवाही करावी तसेच प्रशासनातील दोशी अधिकाऱ्यांना आरोपी करून त्यांच्यावरही तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी उपस्थित पाडळसरे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील, ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, संचालक डॉ अनिल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पुनाजी पाटील,अर्बन बँकेचे रणजित शिंदे, राष्ट्रवादीचे महेंद्र बोरसे, देविदास देसले,शिंदे सेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश देशमुख,काँग्रेसचे धनगर दला पाटील, किरण सावंत,गुणवंत पवार, यांचेसह रामराव पवार, महेश पाटील,प्रा. सुनिल पाटील,रविंद्र पाटील,प्रसाद चौधरी,दिलीप पाटील,कैलास पाटील, प्रताप पाटील, सुशील भोईटे,ॲड.कुंदन साळुंखे, डॉ.रविंद्र पाटील आदींनी दिलेल्या निवेदनाद्वारे चर्चे प्रसंगी केली.

निवेदनाची प्रत अमळनेर पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांनाही देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!